Friday, 15 February 2013

का ग तू रुसलीस का........!


का तू रुसलीस  का........!


का तू रुसलीस  का

का तू फुगलीस   का

सांग ना.....!

काय चुकले माझे ?

हल्ली तू माझ्या दाराशी दिसत नाही

माझ्या इकडच्या वारयात पण,

तुझी जाणीव होत नाही.

सांग बर काय चुकले माझे

काय वाईट  केले मी तुझे

मी का तुला मारले.......?

तुला दुखावले.....?

सांग ना आता गप्प का आहेस

मला तू खूप हवीशी  आहेस   ....!

लवकर ये आणि माझ्याशी बोल ना .......!

तुज्या विना मी अबोली झाली आहे ...!

 

 

No comments:

Post a Comment